नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , प्रदीप कंद व लोचन शिवले यांचा उमेदवारी अर्ज दाखल – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

प्रदीप कंद व लोचन शिवले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद–पेरणे गटात राष्ट्रवादीची ताकद प्रदर्शनात

लोणीकंद / प्रतिनिधी :

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील बहुचर्चित लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रदीप वसंतराव कंद यांनी जिल्हा परिषद सदस्य पदासाठी, तर लोणीकंद–तुळापूर पंचायत समिती गणातून लोचन शिवले यांनी पंचायत समिती सदस्य पदासाठी मंगळवार (दि.२०) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

दोन्ही उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हवेली यशवंत माने यांच्याकडे आंबेगाव बुद्रुक येथील सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,मध्ये उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी युवक काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष जयेश कंद, राकेश कंद, सचिन भोंडवे, पांडुरंग कंद, तुषार झुरुंगे, प्रिया कंद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रदीप कंद यांनी अनेक समर्थकांसह आपला अर्ज दाखल केला.प्रदीप कंद हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे कार्यकर्ते असून, नुकतेच त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याने या गटात लढत अधिक चुरशीची होणार आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031