शेतात राबणाऱ्या आजीच्या विश्वासाचा क्षण ठरला प्रचाराचा केंद्रबिंदू
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद | प्रतिनिधी
रणरणत्या उन्हात शेतात कष्ट करणाऱ्या एका वृद्ध आजीचा आणि लोकप्रतिनिधीवरील विश्वासाचा भावनिक क्षण आज प्रचारादरम्यान पाहायला मिळाला.
लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील तुळापूर गावात प्रचारासाठी आलेल्या प्रदीप कंद यांच्या सौभाग्यवती प्रिया प्रदीप कंद यांचे लक्ष गर्दी, घोषणा आणि वाहनांच्या गडबडीतही शेतात राबणाऱ्या त्या आजीकडे गेले. त्यांनी थेट शेतात जाऊन आजीशी संवाद साधला.एवढ्या उन्हात काम करता आहात, यावेळी मतदान कोणाला करणार? असा प्रश्न विचारताच आजीने कोणतेही नाव न घेता आपल्या जवळ जपून ठेवलेला प्रदीप कंद यांचा फोटो बाहेर काढला.
आजी म्हणाल्या, हा माणूस आमच्या सुख-दुःखात उभा राहिला. पाणी, वीज, रस्ता किंवा मदतीसाठी कधी मागावं लागलं नाही. तो आधीच आला.या क्षणी प्रचार काही काळ थांबला. कोणतेही भाषण किंवा घोषणा न होता, विश्वास आणि ऋणानुबंधाचा हा क्षण उपस्थितांचे लक्ष वेधून गेला.
मतदान केवळ यंत्रावरच नव्हे, तर जनतेच्या मनातही आधीच ठरलेले असते, याचे हे जिवंत उदाहरण असल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





