किरण साकोरे, मोनिका कंद व राणी वाळके यांचा उमेदवारी अर्ज दाखल
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पेरणे-लोणीकंद गटात भाजपाकडून अधिकृत उमेदवारी
लोणीकंद / प्रतिनिधी :
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील बहुचर्चित पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गट क्रमांक ३७ मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार किरण संपत साकोरे यांनी मंगळवारी (दि. २१) जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

तसेच, लोणीकंद पंचायत समिती गण क्रमांक ७३ मधून भाजपाच्या अधिकृत उमेदवार मोनिका श्रीकांत कंद आणि पेरणे पंचायत समिती गण क्रमांक ७४ मधून अधिकृत उमेदवार राणी दत्तात्रय वाळके यांनी पंचायत समिती सदस्य पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही उमेदवारांनी भाजपाच्या कमळ या अधिकृत निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हवेली यशवंत माने यांच्याकडे आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील निवडणूक कार्यालयात आपले अर्ज सादर केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र नारायण कंद, सोमेश्वर महिला पतसंस्थेच्या चेअरमन पूजा कंद, फुलगावच्या विद्यमान सरपंच मंदा साकोरे, सुनील वागस्कर, अविनाश तापकीर, जय कंद, शुभांगी ढगे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजी व उत्साहपूर्ण वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून, येथील लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
याप्रसंगी उमेदवार किरण साकोरे म्हणाले,पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





