योगेश झुरुंगे यांनी बांधले हातावर शिवबंधन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश
लोणीकंद / प्रतिनिधी : शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोणीकंद गावचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातून योगेश बाजीराव झुरुंगे यांच्यासह वंदना अण्णासाहेब शिवले व छाया ज्ञानेश्वर वाळके यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.हा पक्षप्रवेश शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पार पडला. यावेळी सचिव श्रीराम रेपाळे, पुणे जिल्हा प्रमुख निलेश काळभोर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, मी पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा आहे. जोमाने काम करा. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे. शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवून पक्ष अधिक मजबूत करा. प्रवेशानंतर बोलताना योगेश झुरुंगे म्हणाले की, शिवसेनेचे ध्येय-धोरण तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून पूर्ण ताकदीने लढा देत पुणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
दरम्यान, सध्या बहुचर्चित पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी योगेश झुरुंगे यांनी शिवसेनेकडून धनुष्यबाण या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला असून, लोणीकंद गणातून वंदना अण्णासाहेब शिवले व पेरणे गणातून छाया ज्ञानेश्वर वाळके यांनी पंचायत समिती सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. हे दोन्ही उमेदवार पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक लढविणार आहेत.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





