लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात भाजपाचा प्रचार शिगेला
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार किरण साकोरे व मोनिका कंद, राणी वाळके यांचा प्रचार दौरा जोमात
लोणीकंद प्रतिनिधी : लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून, जिल्हा परिषद सदस्य पदाचे अधिकृत उमेदवार किरण संपत साकोरे व पंचायत समिती सदस्य पदाच्या अधिकृत उमेदवार मोनिका श्रीकांत कंद, राणी दत्तात्रय वाळके यांचा प्रचार दौरा नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात पार पडत आहे. हे तिन्ही उमेदवार कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे.
भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद यांच्या नेतृत्वाखाली हा प्रचार दौरा गटातील विविध गावांमध्ये, वॉर्डांमध्ये आणि वस्त्यांमध्ये मोठ्या उत्साहात सुरू असून, या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधण्यात येत आहे. प्रचारादरम्यान नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यांच्या प्रश्नांना समजून घेण्यावर भर देण्यात येत आहे.
स्थानिक पातळीवरील मूलभूत सुविधा, शेतीविषयक अडचणी, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, रोजगार तसेच युवक व महिलांच्या प्रश्नांबाबत सखोल चर्चा करण्यात येत असून, या समस्यांवर ठोस आणि सकारात्मक उपाययोजना राबविण्याचा निर्धार उमेदवारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन भविष्यातील विकासाचा स्पष्ट व नियोजित आराखडा नागरिकांसमोर मांडण्यात येत आहे.
या प्रचार दौर्याला लोणीकंदसह संपूर्ण गटातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रदीपदादा कंद यांच्या कार्यपद्धतीवर जनतेचा वाढता विश्वास स्पष्टपणे दिसून येत आहे. विकास, पारदर्शकता आणि लोकहित या मूल्यांवर आधारित नेतृत्वाला नागरिकांचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र या प्रचार दौर्यातून ठळकपणे समोर येत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





