नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद: वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांना श्रद्धांजली.. – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद: वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांना श्रद्धांजली..

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद प्रतिनिधी :

लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार यांचे रविवार (दि.१) रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालेल्या आकस्मिक निधनाची बातमी अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण पोलीस प्रशासनासह लोणीकंद परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन तसेच लोणीकंद ग्रामस्थांच्या वतीने लोणीकंद पोलीस ठाण्यात शोकसभा आयोजित करण्यात आली. यावेळी दिवंगत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या शोकसभेला सामाजिक कार्यकर्ते उत्तम भोंडवे, चंद्रकांत वारघडे, माजी उपसभापती नारायण कंद, ज्येष्ठ पत्रकार शरद पाबळे, माजी सरपंच श्रीकांत कंद, माजी उपसभापती रवींद्र कंद, सर्जेराव वाघमारे, योगेश झुरुंगे, प्रदीप वसंत कंद, मीनाकाकी सातव, शांताराम कटके, लोचन शिवले, संजय कंद, श्रीमंत झुरुंगे, अनिल चोंधे यांच्यासह परिसरातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक, पोलीस अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

शोकसभेदरम्यान उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सर्जेराव कुंभार यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिस्तप्रिय व कार्यक्षम कार्यशैलीमुळे त्यांनी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना नेहमीच योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. कुंभार साहेब हे कर्तव्यदक्ष, संवेदनशील आणि सामान्य नागरिकांशी आपुलकीने वागणारे अधिकारी म्हणून परिचित होते.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावली. त्यांच्या निधनाने पोलीस दलाने एक अनुभवी, कर्तृत्ववान आणि संवेदनशील अधिकारी गमावला असून, यावेळी अनेक उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळताना दिसून आले.

दिवंगत सर्जेराव कुंभार यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. ते गेले दीड वर्ष लोणीकंद पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031