नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात भाजपाचा झेंडा; प्रदीप कंद यांचे वर्चस्व कायम – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात भाजपाचा झेंडा; प्रदीप कंद यांचे वर्चस्व कायम

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद प्रतिनिधी :

लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गट क्रमांक ३७ (ओबीसी – सर्वसाधारण) मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण संपत साकोरे यांनी ३०५१ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच लोणीकंद पंचायत समिती गण क्रमांक ७३ (सर्वसाधारण महिला) मधून मोनिका श्रीकांत कंद आणि पेरणे पंचायत समिती गण क्रमांक ७४ (सर्वसाधारण महिला) मधून राणी दत्तात्रय वाळके यांनीही विजय संपादन करत लोणीकंद–पेरणे गटात भाजपाचा झेंडा फडकवला आहे.

तिन्ही जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आल्याने या गटात भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही उमेदवारांनी भाजपच्या कमळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली होती. या विजयामुळे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांचे या गटातील राजकीय वर्चस्व कायम राहिले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषद गट क्रमांक ३७ – अंतिम मतमोजणी एकूण मतदान : २८,४११, किरण संपत साकोरे (भाजप) – १५,२३४ मते, प्रदीप वसंत कंद (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) – १२,१८३ मते, योगेश बाजीराव झुरुंगे (शिवसेना) – ८३० मते, नोटा – १६४ मते किरण संपत साकोरे ३०५१ मतांनी विजयी

लोणीकंद पंचायत समिती गण क्रमांक ७३ – अंतिम मतमोजणी एकूण मतदान : १३,५७१, मोनिका श्रीकांत कंद (भाजप) – ८,७२२ मते, लोचन शिवले – ४,२३६ मते, वंदना शिवले – ४७० मते, नोटा – १४३ मते, मोनिका श्रीकांत कंद ४४८६ मतांनी विजयी

पेरणे पंचायत समिती गण क्रमांक ७४ – अंतिम मतमोजणी एकूण मतदान : १४,८४०, राणी दत्तात्रय वाळके (भाजप) – ७,२६७ मते, संगीता वाळके – ६,९७५ मते, छाया वाळके – ३९५ मते, संध्या कांबळे – ६५ मते, नोटा – १३८ मते, राणी दत्तात्रय वाळके २९२ मतांच्या फरकाने विजयी, निकाल जाहीर होताच मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, गुलालाची उधळण करत आणि जोरदार घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031