नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , महाशिवरात्रीनिमित्त लोणीकंद येथील श्रीमृत्युंजयेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरण – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

महाशिवरात्रीनिमित्त लोणीकंद येथील श्रीमृत्युंजयेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरण

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी :

हवेली तालुक्यातील लोणीकंद येथील श्रीमृत्युंजयेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या मंगलमय निमित्ताने भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ग्रामस्थ व भाविकांनी श्री महादेवांचे मनोभावे दर्शन घेत सर्वांच्या निरोगी आरोग्य, सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सुंदर आरासाने सजविण्यात आला होता. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. “हर हर महादेव” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. जवळपास हजारो भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले.

यावेळी पूजा-अर्चा, अभिषेक, धार्मिक विधी तसेच भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवात जेष्ठ नागरिक, महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भक्तिभावाने उत्सवात सहभागी होताना मन प्रसन्न व सकारात्मक झाल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली.आलेल्या भाविकांसाठी आयोजकांच्या वतीने खिचडी नास्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. सुयोग्य नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थेमुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत व अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031