प्रशासनाच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे..
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद प्रतिनिधी :
लोणीकंद हद्दीतील लोणीकंद–थेऊर अष्टविनायक मार्गावरील राजेश इस्ट इनिग्मा सोसायटी (सोनबा नगर) समोरील रस्त्यावर वारंवार घडणारे अपघात टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी सोसायटीतील सदस्य, सभासद व रहिवाशांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते, मात्र प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
या संदर्भात नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वी लेखी निवेदन सादर करून अनेक वेळा पाठपुरावा केला होता. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर मंगळवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती.
सदर परिसरात पेट्रोल पंप, गॅलक्सी इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच सोमवंशी अकॅडमी यांसारख्या शैक्षणिक संस्था असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक व नागरिकांची वर्दळ असते. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मार्ग उताराचा असल्यामुळे अवजड वाहने भरधाव वेगाने धावत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.दरम्यान, मागील आठवड्यात याच ठिकाणी एका अल्पवयीन मुलाचा गंभीर अपघात झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याची तीव्र भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





