महसूल विभागाची खाण क्रशरवर कारवाई; १० क्रशरचा वीजपुरवठा खंडित
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
नियमबाह्य खाण क्रशरवर कारवाई सुरूच राहणार : अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील
महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुक्यातील खानपट्टा असलेल्या वाघोली व लोणीकंद परिसरातील विक्री परवाना नसलेल्या खाण क्रशरवर महसूल प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. महसूल विभाग, महावितरण विभाग व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त मोहिमेत मंगळवार (दि. २४) रोजी वाघोली परिसरातील दहा खाण क्रशर चालकांचा वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली.
सन २०२५–२०२६ या आर्थिक वर्षात गौण खनिज उत्खननासाठी देय असलेली स्वामीत्व धनाची रक्कम न भरलेल्या खाणींवरही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. वीजपुरवठा खंडित करण्याच्या या कारवाईमुळे नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या खाण क्रशर चालकांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाचा इशारा स्पष्ट झाला आहे.
यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाण क्रशर चालकांवर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती लोणीकाळभोर अपर तहसील कार्यालयाच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली.जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वी अनेक वेळा क्रशर मालक व खानपट्टा धारकांना नियमांचे पालन करण्याबाबत लेखी तसेच तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच संबंधितांची वारंवार बैठका आयोजित करून आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले होते. तरीही विक्री परवाना न घेणारे तसेच स्वामीत्व धनाची रक्कम न भरलेले व्यावसायिक आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हवा प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली असून, या कारवाईद्वारे खाण मालक व क्रशर धारकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





