नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची लूट; अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची लूट; अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची लूट; अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोणीकंद, प्रतिनिधी :

लोणीकंद परिसरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका तरुणाला लुटल्याची घटना घडली असून या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद तालुका हवेली येथे राहणारा सर्जेराव मोरे ( वय ३४ )हा तरुण दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे १.५० वाजण्याच्या सुमारास पुणे–अहिल्यानगर रोडवरील बारावा मैल परिसरात लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करत फिर्यादीजवळ येऊन जबरदस्तीने त्यांच्याकडील मोबाईल फोन व सुमारे १० हजार रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली आणि तेथून पसार झाले.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३(५) अंतर्गत अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया वंजारी करीत आहेत.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031