लोणीकंद खंडोबा मंदिरासमोरील माळावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच; नागरिकांत संताप
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद (ता. हवेली) : लोणीकंद येथील खंडोबा मंदिरासमोरील माळरानावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाघोली परिसरातील काही गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचरा ट्रक व छोट्या वाहनांद्वारे आणून लोणीकंद परिसरात टाकला जात असल्याचा आरोप सकाळी व्यायामाला जाणाऱ्या स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील काही सोसायट्यांनी कचरा उचलण्यासाठी खाजगी ठेकेदारांची नेमणूक केली आहे. हे ठेकेदार सोसायट्यांमधील कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट न लावता तो थेट लोणीकंद परिसरातील मोकळ्या माळरानावर टाकत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. लोणीकंद ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी व कचरा टाकण्याचे प्रकार तात्काळ थांबवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





