नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंदमध्ये विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांवर गुन्हा – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंदमध्ये विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांवर गुन्हा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी :

लोणीकंद परिसरातील गोकुळ पार्क, फेज-२ येथे २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह सासू, सासरा आणि दीर अशा चौघांविरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत विवाहितेचे नाव वैष्णवी यशवंत लाटे (वय २२) असे असून ती गोकुळ पार्क, फेज-२, बकोरी रोड, लोणीकंद येथे राहत होती. याप्रकरणी तिची आई गंगाबाई अशोक जामकर (वय ४८, रा. वडगाव गुंदा, जि. बीड) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १४) सकाळी सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास सततच्या छळाला कंटाळून वैष्णवी हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वैष्णवीचा विवाह यशवंत शिवनाथ लाटे (वय २८) याच्याशी झाला होता.

विवाहानंतर पती वेळोवेळी तिला मारहाण करून शिवीगाळ करत असे तसेच माहेरहून पैसे आणण्याची मागणी करून मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या छळात सासू सखूबाई शिवनाथ लाटे (वय ५०), सासरा शिवनाथ महादेव लाटे (वय ५५) आणि दीर सूरज शिवनाथ लाटे यांचाही सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. पुढील तपास लोणीकंद पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक करीत आहेत.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031