स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले अभिवादन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्रीक्षेत्र तुळापूर येथील पवित्र समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले व समाधीचे दर्शन घेतले.

यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, बापुसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्य, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पंचायत समिती सदस्या मोनिका कंद, राणी वाळके, वढू बुद्रुकचे सरपंच कृष्णा आरगडे, तुळापूरच्या प्रशासक सरपंच गुंफा इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, मंडल अधिकारी संदीप झिंगाटे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, परिसरातील गावांचे सरपंच-उपसरपंच, आजी-माजी पदाधिकारी तसेच विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि राज्यभरातून आलेले शंभूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुण्यतिथीनिमित्त आयोजित मुकज्योत पदयात्रेत गावकऱ्यांसमवेत सहभाग घेतला. तसेच तुळापूर येथील संगमस्थळी जाऊन संगमेश्वर मंदिर येथे दर्शन घेतले.

तुळापूर स्मारकाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती घेत त्यांनी ही कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी श्रीक्षेत्र तुळापूर येथील पवित्र समाधीस्थळी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व शिवप्रेमींनी राजेंच्या समाधीस भेट देऊन पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतेने व आदरपूर्वक अभिवादन केले. संपूर्ण परिसरात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





