नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , वाघोलीत एसईझेड डब्लूएओची ‘ग्रीन अर्थ’ अंतर्गत स्वच्छता मोहीम – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

वाघोलीत एसईझेड डब्लूएओची ‘ग्रीन अर्थ’ अंतर्गत स्वच्छता मोहीम

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वाघोली : चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसायटीच्या युवा प्रौढ कर्मचारी स्वयंसेवक गट एसईझेड डब्लूएओयांच्या वतीने रविवारी (दि.२६) रोजी वाघोली-लोहगाव रस्ता परिसरात ग्रीन अर्थ आणि नो प्लास्टिक अभियानांतर्गत भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या उपक्रमात सुमारे ५० स्वयंसेवकांनी सहभाग घेत परिसरातील प्लास्टिक व इतर घनकचरा हटवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

या अभियानात एसईझेड डब्लूएओचे स्वयंसेवक, पुणे महानगरपालिकेचे १० कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. परिसरात बेकायदेशीररीत्या टाकण्यात आलेला प्लास्टिक व इतर घनकचरा गोळा करून ५ लिटर क्षमतेच्या ३५ पिशव्या भरून सुमारे एक टन कचरा पुणे महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक वाहनात जमा करण्यात आला.

या उपक्रमासाठी पुणे महानगरपालिकेने आवश्यक स्वच्छता साहित्य उपलब्ध करून दिले. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मिलिंद खांदोडे, सुनील घोळवे, आरोग्य निरीक्षक गोपाळकृष्ण नायडू तसेच मुकादम सुरेश उबाळे यांनी अभियानात सहभाग घेत स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक केले.

एसईझेड डब्लूएओ च्या प्रतिनिधींनी सांगितले की, भविष्यातील पिढीसाठी स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत पृथ्वी निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. अधिकाधिक नागरिकांनी अशा उपक्रमांत सहभागी होऊन प्लास्टिकमुक्त व स्वच्छ परिसर घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

एसईझेड डब्लूएओहा चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसायटीचा आंतरराष्ट्रीय युवा प्रौढ कर्मचारी स्वयंसेवक गट असून, महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये ग्रीन अर्थ ब्लू ऑक्टोन आणि नो मोअर जीपीजीपी यांसारख्या पर्यावरण संरक्षण मोहिमा सातत्याने राबवत आहे. याशिवाय अनाथालये, वृद्धाश्रम, आरोग्य सेवा तसेच कोविड-१९ काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे.

चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसायटी ही जगातील १७५ देशांतील ७८००हून अधिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असून तिचे ४० लाखांहून अधिक सदस्य आहेत. हवामान बदल, गरिबी निर्मूलन, शिक्षण, आरोग्य, शाश्वत शहरे, शांतता आणि सामाजिक ऐक्य या क्षेत्रांत ४७ हजारांहून अधिक समाजसेवा उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेला जगभरातील विविध सरकारे व संस्थांकडून ५८०० हून अधिक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31