दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या चाऱ्यासाठी गौरव झुरुंगे यांच्याकडून एक लाखांची मदत
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद टाईम्स प्रतिनिधी :
लोणीकंद (ता. हवेली) : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि मुक्या जनावरांना चाऱ्याच्या माध्यमातून दिलासा मिळावा, या उद्देशाने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हाती घेतलेल्या सामाजिक उपक्रमाला प्रतिसाद देत लोणीकंद येथील गौरव राजाराम झुरुंगे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात पुढे केला.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गौरव झुरुंगे यांनी ही आर्थिक मदत सुपूर्द केली. पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, नगरसेविका रत्नमाला सातव, सुरेंद्र पठारे, ऐश्वर्या पठारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक भागांतील नागरिकांसह पशुधनासमोर चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत मुक्या जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या सामाजिक भावनेतून गौरव झुरुंगे यांनी ही मदत केली.
सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त भागातील पशुधनासाठी आर्थिक योगदान देण्याच्या त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. समाजातील गरजू घटकांसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे, असा संदेशही या उपक्रमातून पुढे आला आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





