विद्युत रोहित्र दुरुस्त; ग्रामस्थांकडून प्रदीपभाऊ कंद यांचे आभार
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद टाईम्स, प्रतिनिधी
लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील पिंपरी सांडस येथील साहेबराव भोरडे यांच्या शेताजवळील विद्युत रोहित्र खराब झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. परिणामी भोरडे वस्तीचा विद्युत पुरवठा पूर्णतः खंडित झाला होता.
या समस्येबाबत ग्रामस्थ विजय भोरडे, महेश भोरडे, गुलाब श्रीराम, शिवाजी श्रीराम तसेच दीपक वायरमेन व गव्हाणे वायरमेन यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस प्रदीपभाऊ वसंत कंद यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रदीपभाऊ कंद यांनी त्वरित संबंधित विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून डीपीची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यानुसार विद्युत कर्मचारी दीपक भोरडे व गव्हाणे यांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही विद्युत रोहित्रांची दुरुस्ती केली.डीपी क्रमांक एकमधील आईल गळती दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
या तात्काळ कारवाईमुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून भोरडे वस्तीतील नागरिकांनी विद्युत समस्या तत्काळ सोडवल्याबद्दल प्रदीपभाऊ कंद यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





