नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पेरणेत एसईझेड डब्लूएओची ‘ग्रीन अर्थ’ अंतर्गत स्वच्छता मोहीम – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

पेरणेत एसईझेड डब्लूएओची ‘ग्रीन अर्थ’ अंतर्गत स्वच्छता मोहीम

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पेरणे : चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसायटीच्या एसईझेड डब्लूएओ,युवा प्रौढ कर्मचारी स्वयंसेवक गट यांच्या वतीने २८ जून रोजी पुणे जिल्ह्यातील पेरणे गावात ग्रीन अर्थ या स्थलीय परिसंस्था संरक्षण प्रकल्पांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आयोजित या मोहिमेत स्वयंसेवकांसह स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सकाळी सुमारे ११ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात एसईझेड डब्लूएओचे स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक असे सुमारे ७० जण सहभागी झाले होते. परिसरात बेकायदेशीररीत्या टाकण्यात आलेल्या प्लास्टिकचा व इतर कचऱ्याचा मोठा साठा स्वयंसेवकांनी साफ केला. प्लास्टिकचे कप, स्ट्रॉ, पॉलिथिन पिशव्या, डबे तसेच घरगुती कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. सुमारे एका तासाच्या मोहिमेत लिटर क्षमतेच्या पिशव्यांमध्ये कचरा संकलित करण्यात आला.

या मोहिमेसाठी पेरणे ग्रामपंचायतीने आवश्यक स्वच्छता साहित्य उपलब्ध करून दिले. यावेळी सरपंच श्रीमती उषा दशरथ वाल्के यांनी स्वयंसेवकांचे अभिनंदन करत त्यांच्या पर्यावरणपूरक व सेवाभावी कार्याचे कौतुक केले.

एसईझेड डब्लूएओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “भविष्यातील पिढीचे नेतृत्व करणारे युवा आपल्या घरातून, कार्यस्थळातून आणि दैनंदिन जीवनातून पर्यावरण संरक्षणाची सवय अंगीकारून पृथ्वीचे शाश्वत भविष्य घडवण्यासाठी एकत्र आले आहेत. मानवजातीचे आणि पृथ्वीचे आरोग्य व आनंद टिकवण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.”स्वच्छ आणि सुंदर झालेला परिसर पाहून स्वयंसेवकांनी समाधान व्यक्त केले.

एसईझेड डब्लूएओने आजपर्यंत भारतातील विविध राज्यांमध्ये पर्यावरण आणि समाजहितासाठी अनेक सेवा उपक्रम राबविले आहेत. महाराष्ट्रातील पुणे, छत्तीसगडमधील भिलाई आणि पश्चिम बंगालमधील दीघा येथे ग्रीन अर्थ , ब्लू ऑक्टोन आणि नो मोअर जीपीजीपी यांसारख्या प्रकल्पांद्वारे स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीचे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. याशिवाय अनाथालये व वृद्धाश्रमांमध्ये सेवा, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच कोविड-१९ काळात वैद्यकीय कर्मचारी, पोलीस व अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना अल्पोपहार देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्यही संस्थेने केले आहे.

या समाजोपयोगी कार्याची दखल घेत भारतातील विविध सरकारी संस्था आणि मान्यवरांनी एसईझेड डब्लूएओला प्रशस्तीपत्रे व गौरवपत्रे प्रदान केली आहेत.चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसायटी ही जगातील १७५ देशांतील ७,८०० हून अधिक चर्चमध्ये कार्यरत असून तिचे ४० लाखांहून अधिक सदस्य आहेत. “आपल्या शेजाऱ्यावर स्वतःप्रमाणे प्रेम करा” या शिकवणीचे पालन करत संस्थेने हवामान बदल, गरिबी व भूक निर्मूलन, शिक्षण, आरोग्य, शाश्वत शहरे आणि जागतिक शांतता यांसारख्या क्षेत्रांत ४७ हजारांहून अधिक सामाजिक सेवा उपक्रम राबविले असून, या योगदानाबद्दल संस्थेला जगभरातील विविध सरकारे व संस्थांकडून ५,८०० हून अधिक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31