नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , खरोळा जिल्हा परिषद शाळेतील गैरहजर शिक्षकावर कारवाईची मागणी – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

खरोळा जिल्हा परिषद शाळेतील गैरहजर शिक्षकावर कारवाईची मागणी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

युवा संकल्प संस्थेचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

लातूर, प्रतिनिधी : खरोळा येथील जिल्हा परिषद शाळेत नियुक्ती होऊनही गेल्या १५ दिवसांपासून रुजू न झालेल्या शिक्षकावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवा संकल्प संस्थेने केली आहे. याबाबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओम माळी यांनी जिल्हा परिषद लातूरचे शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

खरोळा येथील जिल्हा परिषद शाळेसाठी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून दोघांचेही नियुक्ती आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी अर्चना बाबुराव फावडे या शिक्षकांना नियुक्ती आदेश मिळून तब्बल १५ दिवस उलटूनही त्या अद्याप शाळेत रुजू झालेल्या नसल्याचा आरोप युवा संकल्प संस्थेने केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकाला दोन दिवसांत शाळेवर रुजू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती ओम माळी यांनी दिली.

निवेदनात, नियुक्ती आदेश अस्तित्वात असतानाही संबंधित शिक्षक अद्याप रुजू का झाले नाहीत, याचे कारण प्रशासनाने तात्काळ स्पष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, चौकशीत विनाकारण विलंब झाल्याचे आढळल्यास वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल संबंधित शिक्षकाविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित या गंभीर प्रकरणात प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन रिक्त पदावरील शिक्षकाला त्वरित शाळेत रुजू करावे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायदेशीर व लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओम माळी यांनी दिला आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31