लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई! मॅफेड्रॉन ड्रग्ज तस्करी करणाऱ्या सात आरोपींना बेड्या; २३ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद टाईम्स प्रतिनिधी :
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रांची खरेदी-विक्री आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात लोणीकंद पोलिसांनी मोठी कारवाई करत मॅफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज विक्री व पुरवठा करणाऱ्या साखळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १२८.३ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज, तीन देशी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, तीन कार आणि दोन मोबाईल फोन असा एकूण २३ लाख २७ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी लोणीकंद पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार शुभम चिनके आणि सुधीर शिवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कटकेवाडी फाटा, लोणीकंद येथे सापळा रचून प्रतीक उर्फ सोन्या दत्तात्रय होले (वय ३५, रा. लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १९.४ ग्रॅम एमडी ड्रग्ज, एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल फोन आणि टाटा सफारी कार असा एकूण ९ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली.
प्रतीक होले याच्याकडे अधिक तपास केला असता दि. ३० ऑक्टोबर रोजी विशाल शिवाजी माकर (वय २६, रा. ढोकसांगवी, ता. शिरूर) आणि सोमनाथ संजय गोरे (वय २४, रा. न्हावलेनगर, हांडेवाडी, हडपसर, पुणे) यांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे असा एकूण ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
यानंतर आरोपींकडे केलेल्या पुढील तपासातून दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पेरणे फाटा येथे पोलिसांनी सापळा रचला. यावेळी विशाल ऊर्फ दादा रामदास कोलते (वय ३४, रा. बकोरी, ता. हवेली), राजुराम उमेदराम चंवेल (चौधरी) (वय ३४, रा. रांजणगाव, ता. शिरूर, मूळ रा. जोधपूर, राजस्थान), वैभव बाळू खेडकर (वय २८, रा. खेडकर वस्ती, रांजणगाव, ता. शिरूर) आणि शिवम प्रशांत देडगे (वय २१, रा. विशाल विश्व सोसायटी, फेज २, सणसवाडी, ता. शिरूर) या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
या चौघांकडून १०८.९ ग्रॅम एमडी ड्रग्ज, मोबाईल फोन आणि दोन स्विफ्ट कार असा एकूण १३ लाख ३६ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या संपूर्ण कारवाईत लोणीकंद पोलिसांनी सात आरोपींना अटक करून अंमली पदार्थांच्या तस्करीची साखळी उघडकीस आणली आहे. ड्रग्ज तस्करीसोबतच अवैध शस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कागणे, पोलीस उपनिरीक्षक स्वाती डंबाळे तसेच पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव, सागर जगताप, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, दिनेश मरकड, सुधीर शिवले, सागर वाळके, अजिंक्य ढमढेरे आणि निखिल गोपाळे यांनी सहभाग घेतला.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





