नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , वाजेवाडी- मांजरेवाडीच्या उपसरपंचपदी सुरेखा मांजरे यांची बिनविरोध निवड – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

वाजेवाडी- मांजरेवाडीच्या उपसरपंचपदी सुरेखा मांजरे यांची बिनविरोध निवड

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

मांजरे घराण्याला तिसऱ्यांदा उपसरपंचपदाचा मान; ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

वाजेवाडी : शिरूर तालुक्यातील वाजेवाडी -मांजरेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेखा रमेश मांजरे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या त्या भगिनी आहेत.

उपसरपंच सुरज मधुकर तिखे यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंचपद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपसरपंचपदासाठी सुरेखा रमेश मांजरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच पूनम चौधरी यांनी जाहीर केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मांजरे घराण्याला तिसऱ्यांदा उपसरपंचपदाचा मान

यापूर्वी काळुराम मांजरे आणि धर्मराज मांजरे यांनी उपसरपंचपद भूषविले होते, आता सुरेखा रमेश मांजरे यांच्या निवडीमुळे मांजरे घराण्याला तिसऱ्यांदा उपसरपंचपद भूषविण्याचा मान मिळाला आहे. त्यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सुरेखा मांजरे यांच्या निवडीबद्दल लोणीकंदचे माजी उपसरपंच संजय कंद, नागेश वाळके, संपत कंद, सतीश कंद, सुरेश कंद, योगेश कंद, जय कंद, नितीन कंद, दिनेश कंद, रोहित कंद, डॉ. राकेश कंद, मनीष सातव, ज्योती मासळकर, स्वाती दरगुडे आणि शोभा कंद यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30