नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंदच्या जिल्हा परिषद शाळेचे राज्यस्तरावर कौतुक; प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची शाळेला भेट! – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंदच्या जिल्हा परिषद शाळेचे राज्यस्तरावर कौतुक; प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची शाळेला भेट!

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

‘पुणे मॉडेल स्कूल’ आणि पीएमश्री उपक्रमांतून ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा; डिजिटल क्लासरूम, रोबोटिक लॅब आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीची केली पाहणी

लोणीकंद टाईम्स, प्रतिनिधी :

हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणीकंद येथे महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी भेट देऊन शाळेतील आधुनिक शैक्षणिक सुविधा, डिजिटल क्लासरूम, विविध शैक्षणिक उपक्रम आणि शैक्षणिक दर्जाची पाहणी केली. ग्रामीण भागातील शाळेत राबविण्यात येत असलेल्या आधुनिक शैक्षणिक उपक्रमांचे आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचे प्रधान सचिवांनी विशेष कौतुक केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी प्रशंसा केली. ग्रामीण भागातील शाळाही आधुनिक शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, याचे लोणीकंद शाळा हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

शाळेच्या भेटीदरम्यान राज्याच्या शिक्षणमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. यावेळी प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी लोणीकंद शाळेच्या प्रगतीचा उल्लेख करत पीएमश्री आणि मॉडेल स्कूल उपक्रमांच्या माध्यमातून शाळेत होत असलेल्या सकारात्मक बदलांचे कौतुक केले.

मॉडेल स्कूल आणि पीएमश्री योजनेमुळे विद्यार्थिसंख्येत झालेली वाढ, शैक्षणिक गुणवत्तेत झालेली सुधारणा, रोबोटिक लॅबसारखे आधुनिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधांची माहिती यावेळी सादरीकरणाद्वारे देण्यात आली. या सादरीकरणातील विविध मुद्द्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनीही दुजोरा दिला.

भेटीदरम्यान प्रधान सचिवांनी शाळेतील आयसीटी लॅब, रोबोटिक लॅब आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध विज्ञान प्रकल्पांची माहिती घेतली. नासा-इस्रो उपक्रमांतर्गत सहभागी झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे अनुभव जाणून घेतले. तसेच नासा, इस्रो, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि खान ॲकॅडमी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्यात आली.

नासा-इस्रो दौऱ्यात सहभागी झालेल्या दोन विद्यार्थिनींशी प्रधान सचिवांनी संवाद साधत त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाविषयी निर्माण होणारी जिज्ञासा तसेच त्यांना मिळणाऱ्या अनुभवांचे महत्त्व अधोरेखित झाले.

शाळेत शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही यावेळी घेण्यात आली. ऑनलाइन विद्यार्थी उपस्थिती ॲपचे प्रात्यक्षिक पाहण्यात आले. यासोबतच मुख्य कार्यालयातील फाईल्सची व्यवस्थित मांडणी आणि प्रशासकीय कामकाजातील शिस्त यांचीही पाहणी करण्यात आली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने सुधारणा घडवून आणणे, या दिशेने लोणीकंद शाळेत सुरू असलेल्या प्रयत्नांची या भेटीतून दखल घेण्यात आली.

या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपसंचालक मछिंद्रनाथ कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, डायटचे प्राचार्य नामदेव शेंडकर, शिरूरचे गटशिक्षणाधिकारी कोकणे, हवेलीचे गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे, विस्तार अधिकारी निलेश धानापुणे व जीवन कोकणे, उपशिक्षणाधिकारी आसमां मोमीन, हवेली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख, गोरक्षनाथ झुरुंगे गुरुजी, माजी सरपंच राहुल शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30