नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पुणे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एकाचा मृत्यू, एक जखमी – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

पुणे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एकाचा मृत्यू, एक जखमी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त; चौकशीचे निर्देश

इंदापूर तालुक्यातील मौजे राजवडी येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ साईडपट्टीच्या भरावाचे काम सुरू असताना माती-मुरुमाचा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून, एक मजूर जखमी झाला आहे. जखमी मजुराला तातडीने बाहेर काढून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. या दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून, घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. उड्डाणपुलाजवळ साईडपट्टीच्या भरावाचे काम सुरू असताना अचानक माती-मुरुमाचा ढिगारा कोसळला. त्यावेळी घटनास्थळी तीन मजूर काम करीत होते. त्यापैकी एका मजुराने प्रसंगावधान राखून स्वतःची सुटका करून घेतली. उर्वरित दोन मजुरांपैकी एकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, तर एका मजुराचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव व मदतकार्य हाती घेऊन जखमी मजुराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशासनाकडून घटनेच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30