आळंदीतील लिंबू-मिरचीचा हार ठरतोय आकर्षण
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
आळंदी : दुकान असो, घर असो की चारचाकी गाडी, वाईट नजर लागू नये, या श्रद्धेतून लिंबू-मिरची आणि फुलांचा हार लावण्याची परंपरा आजही कायम आहे. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर किंवा नवीन दुकान सुरू करताना लिंबू-मिरचीचा हार लावण्याला अनेकजण प्राधान्य देत असल्याचे चित्र आळंदी परिसरात पाहायला मिळत आहे.
श्रीक्षेत्र आळंदी येथील श्रीजय जलाराम प्रसाद भांडारचे मालक विलास मेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष प्रकारचा मोठा लिंबू-मिरचीचा हार तयार करण्यासाठी एक किलो हिरव्या मिरच्या, तीन किलो लिंबू, काळा दोरा आणि काळ्या बाहुलीचा वापर केला जातो. या हाराची किंमत सुमारे १५०० रुपये असूनही त्याला ग्राहकांकडून चांगली मागणी मिळत आहे.
नवीन गाडी घेतली किंवा नवीन दुकान सुरू केले की सर्वप्रथम लिंबू-मिरचीचा हार लावण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाळली जाते. विशेषतः अमावस्या, मंगळवार आणि शनिवारी या हाराच्या मागणीत वाढ होत असल्याचे विक्रेते सांगतात.
आधुनिक काळातही परंपरा आणि श्रद्धेचा हा भाग कायम असून, लिंबू-मिरचीच्या मोठ्या हाराला मिळणारा प्रतिसाद ग्राहकांच्या या रूढीवरील विश्वास अधोरेखित करतो.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





