प्रदीप कंद यांनी बजावला पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाचा हक्क
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद | प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी हवेली तालुक्यातील वाघोली येथील महानगरपालिका शाळेतील मतदान केंद्रावर पदवीधर मतदार म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
यंदाच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मतदानाला मिळणारा प्रतिसाद हा लोकशाहीप्रती असलेली नागरिकांची जागरूकता आणि जबाबदारी अधोरेखित करणारा आहे.
मतदान हा केवळ अधिकार नसून लोकशाहीप्रती आपली जबाबदारी आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे असून, प्रत्येक मताच्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट करण्याची संधी मतदारांना मिळते. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





